breaking-newsमनोरंजन

सुष्मिताच्या “दिलबर’ गाण्याची पुनर्निर्मिती “सत्यमेव जयते’मध्ये

हल्ली जुन्या गाजलेल्या गाण्यांचे रिक्रिएशन करण्याचा ट्रेन्ड रुजला आहे. निखील अडवाणीच्या प्रॉडक्‍शनखाली तयार होणाऱ्या आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या “सत्यमेव जयते’मध्येही अशाच एका गाण्याची पुनर्निर्मिती होणार आहे.

सुष्मिता सेनच्या 1990 सालच्या “सिर्फ तुम’मधील “दिलबर’ या गाण्याची नव्याने होणारी नवनिर्मिती “सत्यमेव जयते’मध्ये बघायला मिळणार आहे. मूळ गाणे सुष्मिता सेन आणि संजय कपूरवर चित्रीत झाले होते. तर “सत्यमेव जयते’मध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेहीवर चित्रीकरण झालेले असेल. गेल्या आठवड्यातच या गाण्याचे शुटिंग पूर्ण झाले. “बद्रिनाथ की दुल्हनियां’तील “तम्मा तम्मा’ आणि “ओके जानू’मधील “हम्मा हम्मा’ ला संगीत देणाऱ्या तनिष्क बागचीने या नवीन गाण्याचे संगीत केले आहे.

तनिष्कने या “दिलबर’ला अरेबिक टच दिला आहे. सिनेमामध्ये जेंव्हा जॉन कोणाला तरी पकडण्यासाठी बारमध्ये येतो तेंव्हा बार डान्सर नोरा फतेही हे गाणे सादर करताना दिसणार आहे. जास्तीत जास्त लोकांना अपील व्हावे यासाठी या गाण्यामध्ये बॅली डान्सचा वापर करण्यात आला आहे. गाणे अधिक इंटरेस्टींग करण्यासाठी मध्येच आग आणि धूराचाही वापर खुबीने केलेला दिसणार आहे. या गाण्यासाठी नोराने तब्बल 10 दिवस रिहर्सल केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button