breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारणार त्याची भूमिका

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला एक महिना उलटून गेला असला तरी त्याच्या चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत. त्याच्या आत्महत्येनं अनेक गोष्टींना वाचा फोडली. त्याच्या फॅन्स् पासून ते चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारंपर्यंत अनेकांनी त्याच्या आत्महत्येवर अनेक प्रकारचे भाष्य केले आहेत. त्याची आत्महत्या नसून ती एक हत्या असल्याचं अनेकांच म्हणण आहे आणि यावरच आता सुशांतच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच फर्स्टलुक देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

सुशांतच्या या बायोपिकचं नाव ‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ असणार आहे. या चित्रपटात सुशांतची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता होती. अखेर याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सेम टू सेम त्याच्या सारखा चेहरा असलेल्या सचिन तिवारी नावाच्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हाच सचिन तिवारी आता सुशांतच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार असून दिग्दर्शकाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आलाय. या पोस्टरवर सचिन तिवारीची ओळख ‘आऊटसायडर’ अशी करण्यात आलीये.

सुशांतनं १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. सुशांतचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. टीव्ही अभिनेता म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

दरम्यान, सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली. बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेससर्वा आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती.

सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३७ लोकांची कसून चौकशी केली आहे. पोलीस अजूनही काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button