breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

सुशांतच्या घरात ड्रग्जच्या पार्टी रंगायच्या, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत दावा

मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभागाचं (एनसीबी) एक पथक आज (6 सप्टेंबर) सकाळीच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालेलं आहे. एनसीबीने तिला समन्सही बजावलेलं आहे. कोणत्याही क्षणी एनसीबी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊ शकतेय. सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होत आहे. सुशांतच्या घरात सतत ड्रग्जच्या पार्टी रंगायच्या असा दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत दावा केला आहे.

दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत मोठा दावा, पावना फार्म हाऊसवर सुद्धा ड्रग्ज पार्टी व्हायची, वॉटर स्टोनलाही ड्रग्ज पार्टी व्हायची, 7 पैकी 4 जणांची 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीकडे रिमांड, करन, अब्बास, कैजाद यांना जामीन, इतरांची चौकशी सुरु, आज रियाचीही सखोल चौकशी होणार आहे. भावासोबतच्या ड्रग्ज चॅट आणि पैशांच्या घेवाण देवाणीबद्दल चौकशी होणार व चौकशी नंतर रियाला अटक होण्याची शक्यता आहे. सकाळी सव्वाआठ वाजता एनसीबीचं पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यांच्यासोबत पोलिसांचा लवाजमा देखील होता. स्वतः आयआरएस समीर वानखेडे हे देखील पथकासोबत होते. रियाला समन्स बजावलेलं आहे. तिला चौकसीसाठी सोबत येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्यायही एनसीबीने रियाला दिलेला आहे. त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button