breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीमेवर भारतीय-चीनी सैन्यादरम्यान संघर्ष

गंगटोक | सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्याचे जवान आमने-सामने आले. यावेळी दोन्हीकडील सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत.

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीम येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांना किरकोळ दुखापत झाली. या संघर्षादरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिक आक्रमक झाले होत. यामुळे काहीजण जखमी झाले आहेत. मात्र, नंतर स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आले. तसे पाहिले असता सीमेबाबतच्या वादामुळे अशा घटना भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अधूनमधून घडत असतात. अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर दोन्ही बाजूचे लष्कर प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार निर्माण झालेली समस्या सोडवतात. आजची घटना बर्‍याच दिवसांनी घडलेली आहे. जम्मू-काश्मीर प्रश्नावर चीन सतत वक्तव्ये करताना दिसत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रातील चीनच्या कायमस्वरुपी मिशनच्या प्रवक्त्याने जम्मू-काश्मीरवर काही वक्तव्ये केलेली आहेत. त्या वक्तव्यातील भूमिकेला भारताने नाकारलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button