breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सीमा सावळेंचा पलटवार : इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जाता है!

– भाजपाविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षांतर्गत टीकेला तात्त्विक उत्तर

– महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कामाला विरोध केला, तर चूक काय?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कामांना विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी आणि स्वपक्ष भाजपाला विरोध करणे म्हणजे ‘गद्दारी’अशी टीका भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केली. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून कुणाचेचही नाव न घेता…भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी ‘सोशल मीडिया’द्वारे सूचक संदेश दिला आहे.

        भाजपा प्रवेश केल्यानंतर अल्पावधीत सीमा सावळे यांना स्थायी समिती सभापती म्हणून संधी मिळाली होती. त्यांच्या कार्यकाळात शहरातील हजारो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहे. मात्र, काही विकासकामांवरुन प्रशासन-सत्ताधारी आणि सीमा सावळे यांच्यात मतभेद आहेत.

        सहाजिकच, प्रशासनाला केलेला विरोध हा स्वपक्ष भाजपा आणि नेत्यांना विरोध असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या टिकेच्या ‘धनी’ सीमा सावळे होताना दिसतात. सावळे यांच्यासोबत नगरसेवक तुषार कामठे, संदीप वाघेरे यांनीही प्रशासन आणि आपल्या पक्षाच्या काही मुद्दयांना खुला विरोध केला आहे.

        दरम्यान, शहर भाजपामधील जबाबदार पदाधिकाऱ्यांने चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर खरमरीत टीका केली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही…असा इशाराही दिला. मात्र, त्यांच्या टिकेमध्ये कुणाचेही नाव नव्हते. पण, हा रोख सावळे आणि सहकाऱ्यांवरच होता…ही वस्तुस्थिती आहे. यावर, सीमा सावळे यांनीही दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सूचक पोस्ट अपलोड केली. त्यामध्ये कुणाचेही नाव नाही. पण, लेकी बोले सुने लागे…याप्रमाणे एकप्रकारे टीकाकारांना सावळेंनी प्रत्त्यूतर दिले.

सावळे म्हणतात की, गलत का विरोध खुलकर कीजिए, चाहे राजनीति हो या समाज… इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है; तलवे चाटने वालों पर नहीं।, असा संदेश देत यापुढे चुकीच्या कामाला माझा विरोध राहील…भले पक्षासोबत किंवा पक्षाविरोधात…पण, लाचारी पत्करणार नाही, असा इशारा सीमा सावळे यांनी आपल्या पोस्टद्वारे दिला. त्यामुळे शहर भाजपामध्ये सर्व अलबेल आहे, असे सध्यातरी दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button