breaking-newsराष्ट्रिय

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या २०१७-१८ वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आहे. यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे.

मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण ११,८६,३०६  विद्यार्थी बसले होते. ४, १३८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान पार पडली होती. दरम्यान, लवकरच १० वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सीबीएसईने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button