breaking-newsराष्ट्रिय
सीतेला टेस्ट ट्यूब बेबी बोलणाऱ्या दिनेश शर्मांविरोधात तक्रार दाखल
पाटणा : सीतेचा जन्म टेस्ट ट्युबने झाल्याचे विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. बिहारमधील सीतेची जन्मभूमी असणाऱ्या सीतामढी जिल्ह्यात मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक वकील ठाकूर चंदन सिंह यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी सरोज कुमारी यांच्या कोर्टात आक्षेप पत्र दाखल केलं. ‘दिनेश शर्मा यांनी सीतेवर केलेल्या टिप्पणीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या विधानातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं त्यांनी आक्षेप पत्रात नमूद केलं आहे.