breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सीएसएमटी स्थानकात लोकल ट्रेन बफरला धडकली

मुंबई:- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात हार्बर मार्गावर लोकल ट्रेनने बफरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून या अपघातामुळे लोकल सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे.

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास पनवेलवरुन येणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे ही ट्रेन येत होती. प्लॅटफॉर्मच्या शेवटी सुरक्षेच्या दृष्टीने बफर असून लोकल ट्रेनने बफरला धडक दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या अपघातामुळे हार्बर मार्गारील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button