breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सीएसएमटी ते पनवेल लोकल प्रवासात पार्थ पवारांनी जाणून घेतल्या सामान्यांच्या व्यथा

  • पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घेणार गाठी-भेटी

पनवेल – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी,काॅंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीकडून पार्थ पवार निवडणूक लढवित आहेत. आज (बुधवार) पार्थ पवार यांनी सीएसएमटी ते पनवेल लोकल प्रवास करुन पनवेलमधील सर्वसामान्य नागरिकांसह चाकरमानी यांची अडीअडचणी जाणून घेतल्या. अनेक नागरिकांशी संवाद साधून त्याना दररोज भेडसावणा-या समस्या सोडवण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदार संघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील सहा विधानसभांचा समावेश आहे. यामध्ये रायगडमधील  पनवेल, कर्जत आणि उरण हे  विधानसभा मतदार संघ येतात. मागील दहा ते पंधरा दिवस पिंपरी, चिंचवड आणि मावळ या परिसरात नागरिकांच्या भेटी-गाठी, बैठका घेवून मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पनवेलमधून सुरुवात केली.

याकरिता सीएसएमटी ते पनवेल असा लोकल प्रवास करुन पार्थ पवार यांनी नोकरदार, सर्वसामान्य नागरिक, महिला, मुलींशी संवाद साधला आहे. त्यांना दररोज भेडसावणा-या समस्या जाणून घेतल्या. त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचेही आश्वासन यावेळी त्यांनी नागरिकांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button