breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

“सीएसआर’वर महापालिकेच्या नाले सफाईची मदार

15 मेपर्यंत शंभर टक्के साफसफाई करणार ः आरोग्य विभागाकडे 177 नाल्यांचे टार्गेट

पिंपरी – यंदा महापालिकेची नाले सफाई कामे ठेकेदारांकडून करण्यात येणार नाहीत. तसेच नाले सफाईच्या निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे शंभर टक्के नाले साफसफाई करणे हे आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील नाले साफसफाई करण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात (सीएसआर) फंडातून करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने शहरातील 135 छोटे तर 57 मोठ्या नाल्यांची स्वच्छता करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा नाले सफाईची मदार “सीएसआर’ फंडावर अवलंबून राहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.

महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या काही पदाधिका-यानी पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्‍त कारभाराच्या नावाखाली आरोग्य विभागातील ठेकेदारांना वेठीस धरले जात होते. यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरातील 135 छोटे तर 57 मोठे नाल्यांची पावसाळी पूर्व साफसफाई करण्यास ठेकेदारांना भरलेल्या निविदा गेल्या वर्षी माघारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, आम्ही भरलेल्या निविदा खुली करु नये, अशीही आरोग्य विभागाला विनंती ठेकेदारांनी केली होती.  त्यामुळे शहरातील पावसाळी पुर्व नाल्यांची साफसफाई महापालिका करणार आहे. याकरिता त्यांनी कोणत्याही ठेकेदारांची नेमणूक केलेली नाही. महापालिका आयुक्तांनी नालेसफाई 31 मे अखेर पुर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने 15 मे 2018 पर्यंत सहा क्षेत्रीय कार्यालयामधून नाले साफसफाई करण्याचे टार्गेट ठेवले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आयुक्‍तांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या नाल्याची साफसफाई करण्यास सांगून बांधकाम, स्थापत्य विभागाला मदत करण्याची सुचना केल्या आहेत. यानुसार अनेक बांधकाम व्यावसायिक, काही कंपनीचे मालकांनी पोकलेन, जेसीबी यंत्रसामुग्रीसह कर्मचारी देवून आतापर्यंत 18 नाले सफाईची कामे सुरु केलेली आहे.
दरम्यान, महापालिकेमार्फत माहे एप्रिल पासून नाले सफाईचे कामकाज सुरु आहे. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालय 25, ब क्षेत्रीय कार्यालय 19, क क्षेत्रीय कार्यालय 29, ड क्षेत्रीय कार्यालय 15, ई क्षेत्रीय कार्यालय 20, फ क्षेत्रीय कार्यालय 31, ग क्षेत्रीय कार्यालय 10 आणि ह क्षेत्रीय कार्यालय 28 याप्रमाणे एकूण 177 नाल्यांची साफसफाई करावी लागणार आहे. यामध्ये 15 एप्रिलपर्यत 30 टक्के, 30 एप्रिलपर्यंत 60 ट्क्के आणि 15 मे पर्यंत 100 टक्के नाले सफाई करण्याचे उदिष्ट ठेवले आहे.

जलःनिस्सारण विभागाने सर्व नाल्यांची तपासणी केली आहे. नाल्यांत चेंबर फुटून सांडपाणी वाहत आहे, त्या ठिकाणी सांडपाणी वाहिनी जलःनिस्सारण नलिकेला जोडलेली नाही. ते सर्व कामे 15 मे पर्यंत पुर्वी पुर्ण करुन नालेमधील वाहणारे सांडपाणी बंद करण्यात येणार आहे. शहरातील छोट्या मोठ्या नाल्याची साफसफाई जोरदार सुरु आहे. सर्वच कामे “सीएसआर’ फंडातून करणार आहोत. परंतु, “सीएसआर’ फंडातून कामे केल्याने महापालिकेच्या निधीची निश्‍चित बचत होणार आहे.
मनोज लोणकर , प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button