breaking-newsमनोरंजन

“सिंबा’च्या सेटवर रोहित-रणवीरची मौजमस्ती

वादग्रस्त ठरलेल्या “पद्मावत’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंह सध्या आपल्या आगामी चित्रपट “सिंबा’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यात रणवीरसोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. “सिंबा’च्या शूटिंग दरम्यान रणवीर आणि रोहित यांची चांगलीच दोस्ती जमली असून ते सेटवर खूप मौजमस्ती करत आहेत.

“सिंबा’च्या सेटवरील रोहित आणि रणवीर यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने शेयर करत लिहिले होते की, रोहितने त्याला बर्थ डेला एक महागडी गाडी भेट दिली आहे. त्यानंतर आता रोहितने रणवीरचा एक फोटो शेयर केला असून त्यात तो खूपच इंटेन्स वाटतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहितने एक गंमतीशीर व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओत चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग दाखवण्यात आले असून रणवीर त्यावर कॉमेंन्ट्री करत आहे. रणवीर म्हणतो, माझया जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गाण्याचे चित्रिकरण होत आहे. तेव्हाच तेथे रोहित शेट्टी आणि गणेश आचार्य येतात आणि तिघेही खूप मस्ती करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button