breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

सावित्रीबाई फुले यांचा अवमान: …अखेर पिंपरी- चिंचवडच्या महापौरांनी मागितली माफी!

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांचा निषेध करण्यात आला.

तसेच, केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याकडून माफीची मागणी करण्यासाठी, महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आणि इतर समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने, पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर महापौर माई ढोरे यांनी सर्व आंदोलनकर्त्यां समोर जाहीर दिलगिरी व माफी मागितली. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन तसे जाहीरही केले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आंदोलन आता थांबविण्यात आले आहे. शहरांमधील सर्व कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button