breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सार्वजनिक शौचालयात मुलीचा विनयभंग

सातारा : सातारा शहरातील एका सार्वजिनक शौचालयात अल्पवयीन मुलगी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी शौचालयात गेल्यानंतर एका अनोळखी नराधमाने आतमध्ये जावून दाराची कडी लावून मुलीचा विनयभंग केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणाची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी केसरकर पेठ येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये गेली होती. मुलगी शौचालयाचा दरवाजा ओढून लावत असतानाच एक अनोळखी पुरुष त्या सार्वजनिक शौचालया गेला व मुलगी गेली होती त्या दरवाजातून आत गेला. अज्ञात व्यक्ती अचानक महिलांच्या सार्वजनिक शौचालयात आल्याने त्या मुलीने आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तिने तेथून पळ काढला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button