breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
सारथी संस्थेचा कारभार अखेर अर्थमंत्री अजित पवारांच्याकडे
मुंबई: सारथी संस्थेची जबाबदारी अखेर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आलेली आहे. राज्य सरकारने आजच त्याबाबत एक जीआर जारी केलेला आहे. मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे, असे या जीआरमध्ये म्हटलेले आहे. या आधी या संस्थेची जबाबादारी मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती.