breaking-newsराष्ट्रिय

सामूहिक बलात्काराचा आरोप निघाला “ब्लॅकमेलिंगचा सापळा

जयपूर (राजस्थान) – सामूहिक बलात्काराचा आरोप म्हणजे ब्लॅकमेलिंगचा सापळा असल्याची घटना राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अल्वर जिल्ह्यातील भिवाडी येथे एका महिलेने पाच जणांवर सामूहिक बलात्काराची केस दाखल केली होती; 5 मे रोजी पाच जणांवर सामूहिक बलात्काराची केस दाखल करणारी महिला हनीट्रॅप करणाऱ्या एका गॅंगची सदस्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

दिल्लीच्या नेताजी सुभाष नगरातील एका शॉपिंग मॉलमध्ये ही महिला, रिंगिंग बेल या मोबाईल कंपनीचे मालक मोहित गोयल आणि त्यांचा एक सोबती विकास मित्तल यांना आरोपींकडून 25 लाख रुपये घेताना पोलीसांनी अटक केली. मोहित गोयल आपल्या साथीदारांसह्‌ हनीट्रॅप चालवत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे

हनीट्रॅपच्या महिला श्रीमंत व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर बलात्काराची केस दाखल करून ती मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची वसुली करतात. पोलीसांना त्यांच्या संभाषणाच्या काही ध्वनिफिती मिळाल्या आहेत.

इव्हेंट मॅनेजमेंट करत असल्याचे सांगणारी महिला एका इव्हेंटच्या निमित्ताने या पाच जणांबरोबर चर्चेसाठी भिवाडीच्या एका हॉटेलमध्ये राहिली. दुसऱ्या दिवशी तिने यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा आरोप करत केस दाखल केली. काही दिवसांनी केस मागे घेण्यासाठी तिने पैशांची मागणी केली. ती आरोपींनी मान्य केली, पण तिची मागणी वाढतच गेली, तेव्हा काही गडबड असल्याच्या संशयाने त्यांनी पोलीसात तक्रार केली आणि सापळा रचून पोलीसांनी हनीट्रॅप गॅंगला पुराव्यासह अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button