पुणे

सामाजिक उपक्रमांसाठी महापालिकेचं पाठबळ कमी पडतंय- राजेंद्र सिंह

  • नदीतील जलपर्णी काढून बाबासाहेबांना केले अभिवादनपवना 

पिंपरी – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात प्रदूषणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. शहरातून दोन नद्या वाहतात. पण, दोन्ही नद्या जलपर्णीच्या पूर्णपणे वेढलेल्या आहेत. ज्या शहरातील नदी स्वच्छ असते, त्या शहराचे आरोग्य उत्तम असते. त्यामुळे नदीस्वच्छ करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. सामाजिक संस्था एकत्रित येऊन नदी स्वच्छतेचे उपक्रम राबवित आहेत, त्या उपक्रमांना महापालिकेचे पाठबळ कमी पडत आहे, अशी खंत राजस्तान येथील जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम हे अभियान सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, राजस्थान येथील जलपुरुष राजेंद्र सिंह यांची सोमनाथ मुसुडगे, सोमनाथ हडपूडे, गणेश बोरा आणि शेखर चिंचवडे यांनी भेट घेतली. राजेंद्र सिंह यांना अभियानाबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी चर्चा करताना ते बोलत होते. पवना नदीतील जलपर्णी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अभियानाचा 162 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे सकाळी 8 ते 12 या वेळेत पार पडला. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, रानजाई प्रकल्पाचे 50 मजूर, डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवडचे सदस्य, पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध रोटरी क्लबचे सदस्य, महापालिका अभियंता प्रविण लडकत, क्वीन्स टाऊन जेष्ठ नागरिक संघ, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, एसकेएफ कामगार संघटना, पोलिस मित्र मंडळ, चंद्रकांत राधाबाई, दामोदर कुलकर्णी, पिंपरी चिंचवड शहरातील 40 संस्थाचे सभासद आणि निसर्ग प्रेमी असे एकूण 200 जणांनी मिळून पवना नदीतील जलपर्णी बाहेर काढली.

रविवारी 5 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. आजवर 1 हजार 172 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. यामुळे पवनानदी किवळे ते पिंपरीपर्यंत 90 टक्के जलपर्णी मुक्त झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button