breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

साधी सर्दी किंवा खोकला…लोक करतायत लगेच कोरोनाची तपासणी… रिपोर्टही पॉझिटिव्ह…

जगभरात कोरोना व्हायरसची ईतकी भिती पसरली आहे की लोक थोडीशी जरी सर्दी किंवा खोकला झाला की लगेच तपासणी करत आहेत…आणि आश्चर्याची बाब म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत…पण घाबरून जाण्याचं आता काहीच कारण नाही… तपासणीत जर कोरोना व्हायरसचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी त्याला घाबरण्याची गरज नाही. धोका चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा आहे. देश आणि जगात पहिल्यापासून उपस्थित असलेल्या कोरोना व्हायरसचा धोका नाही.

चीनमध्ये जो कोरोना व्हायरस पसरलेला आहे, तो नवीन व्हायरस आहे. त्याचं नाव ‘2019 नोवल कोरोना वायरस’ आहे. जो  COVID-19च्या नावानंही ओळखला जातो. हा वायरस अद्याप दिल्लीत नाही. याची खातरजमा दिल्लीतल्या फक्त दोन प्रयोगशाळेत होत असून, एम्स आणि एनसीडीसीमध्ये याची तपासणी केली जाते. विनाकारण कोणीही तपासणी करू नका आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी घाबरून जाऊ नका. असंही सांगण्यात आलं आहे…


राम मनोहर लोहिया रुग्णालयातील श्वसन विभागाचे डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की, दोन असे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, ज्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. खरं तर हा जुन्या कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं, जो आपल्या सोसायटीत पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे. या व्हायरसचा प्रभाव नाममात्र आहे. अशातच लोकांनी तपास केल्यास त्यात पॉझिटिव्ह रिपोर्टही येऊ शकतात. परंतु तो सध्या प्रभावशाली असलेला कोरोना व्हायरस नाही, जो चीनमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी घाबरून जाऊ नका. डॉक्टर दीपक सांगतात, आता लोक कोरोनाचं नाव ऐकूनच तपास करण्यासाठी येतात. असं करणं म्हणजे विनाकारण घाबरून जाण्याचा प्रकार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button