breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सात गुन्हेगारांवर शहर, जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई

पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार टोळीतील सात गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे यांनी केली आहे.

गणेश लक्ष्मण लगस (67, रा. संतोषनगर), गजानन शिवानंद स्वामी, ऋषिकेष सिध्दार्थ नंदुरे, किरण संदिप वाडकर, किरण प्रल्हाद मोरे, निखील दिनेश चव्हाण, विजय लक्ष्मण लगस अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख गणेश लगस आहे. हे सर्व जण टोळीच्या माध्यमातून तसेच वैयक्तीक गुन्हे करत होते. त्यांच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, जखमी करणे, धमकी देणे, दुखापत करणे, दरोडा तयारी, प्रतिबंधक आदेशाचा भंग चोरी असे गुन्हे भारती विद्यापीठ, दत्तवाडी, स्वारगेट आणि सहकारनगर पोलीस ठाणे येथे दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button