breaking-newsक्रिडामहाराष्ट्र

साताऱ्याची कोल्हापूरवर मात; मुंबई-पुणे सामना बरोबरीत

महाराष्ट्र कुस्ती लीगला धडाक्यात प्रारंभ

कुस्तीला करमणुकीची जोड देण्याच्या इराद्याने सुरू झालेल्या महाराष्ट्र कुस्ती लीगमध्ये दोन कुस्त्यांदरम्यानचा वेळ भरून काढण्याचे आणि प्रेक्षकांचा उत्साह कायम राखण्याचे आव्हान पार पाडताना आयोजकांची त्रेधा उडत होती. मात्र तरीही या कुस्ती लीगचा शानदार शुभारंभ झाला. पहिल्या सामन्यात यशवंत सातारा संघ कोल्हापुरी मावळ्यांवर भारी पडला, तर मुंबई अस्त्र आणि पुणेरी पलटण यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.

यशवंत साताऱ्याने कोल्हापुरी मावळ्यांना ५-१ अशी धूळ चारली, तर मुंबई-पुणे यांच्यातील लढतीत दोन्ही संघांना ३-३ असे बरोबरीत समाधान मानावे लागले.

शुक्रवारी सायंकाळी पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र कुस्ती दंगलचा सोहळा पार पडला. शुभारंभाच्या सोहळ्यात कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयपीएलने जे काम क्रिकेटसाठी केले, त्या प्रकारेच कुस्तीची लोकप्रियता वाढवून ती घराघरांत पोहोचविण्याचे काम या दंगलमुळे घडेल, असा विश्वास व्यक्त केला. हा सोहळा विलंबाने सुरू झाल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या सादरीकरणाऐवजी ध्वनचित्रफीत सादर करून करमणुकीचा भाग झटपट उरकण्यात आला. क्रीडा आणि करमणुकीचा समन्वय राखणे, दोन्हीं सामन्यांमधील काळातील रिकाम्या जागा भरणे आणि माहितीपूर्ण निवेदनाने रंग भरण्यात निवेदकांची तारांबळ उडत होती.

कुस्ती दंगलच्या रणधुमाळीला सुरुवात

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात शुक्रवारी ‘कुस्ती दंगल’च्या रणधुमाळीला प्रारंभ झाला. सहा सामन्यांपैकी पाच लढती या पुरुष गटात तर एक लढत महिलांमध्ये झाली. त्यात प्रारंभीच्या सत्रात यशवंत सातारा व कोल्हापुरी मावळे यांच्यात लढती झाल्या. त्यात सातारा संघाने कोल्हापूर संघावर बाजी मारली.

‘महाराष्ट्राचा लौकिक वाढेल’

दंगलच्या निमित्ताने सर्वच मल्लांनी जय्यत तयारी करताना तंदुरुस्तीवर सर्वाधिक मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्याचा फायदा भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मराठी मल्लांना मिळू शकणार आहे. त्यामुळे मल्लांचा स्तर उंचावून महाराष्ट्राचा लौकिक वाढण्यास हातभार लागेल, असा सूर सर्व संघांतील प्रमुख मल्लांनी व्यक्त केला. प्रत्येक संघासाठी एका आजीमाजी विख्यात मल्लांना सदिच्छादूत म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभदेखील मल्लांना मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button