breaking-newsपिंपरी / चिंचवड

साठे जयंती आणि टिळक पुण्यतिथीनिमित्त न्यू सिटी प्राईड शाळेत विविध उपक्रम

पिंपरी, (महाईन्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थापक चाबुकस्वार म्हणाले की, “आपल्या झुंजार लेखणीद्वारे सर्जनशील आणि सत्यान्वेशी लेखण करून महाराष्ट्राला प्रभावित करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, साम्यवादी विचारसरणीचे होते. चळवळीत काम करतानाच त्यांचा शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्याशी परिचय झाला. तत्वातर यांच्यासोबत राहून अण्णाभाऊंनी लालबावटा कलापथकाची मुंबईत स्थापना केली.”

“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा देणारे लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते, तर ते शिक्षक, समाजसुधारक आणि आणि वकील सुध्दा होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती.” असेही प्रतिपादन संस्थापक चाबुकस्वार यावेळी केले.

चारुशीला पगार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button