breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक

सांगली – राज्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील कोरोना संसर्ग कमी होत असताना सांगली जिल्ह्याने चिंता वाढवली आहे. येथील मृत्यू दर गेल्या महिनाभरात सात पटीने वाढला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूदरात सांगली जगात सर्वात पुढे पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर ४.०६ टक्के एवढा झाल्याने आरोग्य यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे.

जगातील कोरोना मृत्यूदर सध्या ३.४३ टक्के आहे. भारतात १.८३, तर महाराष्ट्रात हा दर ३.२१ टक्के आहे. सांगलीचा दर सर्वात जास्त ४.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. लोकसंखेच्या तुलनेत जगात सर्वात जास्त मृत्यूदर सांगलीत असल्याने आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे .प्रामुख्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील स्थिती आणखी बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून जुलै महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात राखण्यात सांगली जिल्हा प्रशासनाला यश आले होते. रुग्णांच्या स्वॅब तपासणीनंतर तातडीने दिले जाणारे उपचार आणि कंटेन्मेंटच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले होते. ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button