breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनव्यापार

सहा महिने चित्रपटगृहं बंद असल्याने व्यवसायाला मोठा फटका;तर, लाखो रोजगार धोक्यात

मुंबईसह देशभरातील चित्रपटगृहं कोरोनाच्या पार्श्वभुमिवर 16 मार्चपासून बंद आहेत. चित्रपटगृह बंद करून आज सहा महिने पूर्ण होत आहेत. अर्ध वर्ष थिएटरची दारं बंद राहिल्यानं व्यवसायाला मोठा फटका बसला असून, लाखो रोजगार धोक्यात आले आहेत.

मार्च महिन्यातल्या १३ तारखेला मराठीत ‘एबी आणि सीडी’, हिंदीत ‘अंग्रेजी मीडियम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनतर आजतागायत देशभरातील सिनेमागृहात कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. १३ मार्चनंतर पुढील दोन दिवसांनी, अर्थात १६ मार्चपासून मुंबईसह विविध राज्यांतील चित्रपटगृहं बंद करण्याचा निर्णय त्या-त्या राज्यांच्या सरकारनं घेतला. आज, १६ सप्टेंबरला या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यांत देशभरातील अनेक एकपडदा चित्रपटगृहं कायमस्वरूपी बंद पडली आहेत. त्या सिनेमागृहांत काम करणारे लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना, थिएटरना अद्याप कोणतीही सूट मिळत नसल्यानं ते निराश झाले आहेत. दरमहा १,५०० कोटी रुपये उत्पन्न मिळवणारा सिनेमागृहांचा व्यवसाय आज पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या सहा महिन्यात एकूण अंदाजे नऊ हजार कोटी रुपयांचं नुकसान थिएटर व्यवसायाला झालं असून, २ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनांनी देशभरातील चित्रपटगृहं खुली करण्यासाठी केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला आहे. एकीकडे देशभरातील इतर व्यवसाय पूर्वपदावर येत असताना; सिनेमागृहं व्यवसाय मात्र अद्याप बंदच आहे. याविषयी उपरोक्त संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात ते म्हणटलंआहे ‘अनलॉकच्या प्रक्रियेत देशभरातील विविध श्रेणींमधील उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. परंतु, सिनेमागृह व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. ‘मल्टिप्लेस असोसिएशन ऑफ इंडिया’नं आखून दिलेल्या नियमांचं आणि सुरक्षा उपाययोजनांचं पालन सर्व सिनेमागृहांना करणं बंधनकारक आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेलाचा सर्वाधिक प्राधान्य यात देणात आलं आहे.

मुंबई, दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये प्राथमिक तयारीच्या दृष्टीनं मॉकड्रीलदेखील यशस्वीपणे पूर्ण केली आहे. सिनेमागृहांच्या संपूर्ण इमारतीची आणि हॉलची नियमितपणे स्वच्छता करण्यात येत आहे. थिएटरमध्ये स्वच्छता कर्मचारी पीपीई कीटमध्ये कार्यान्वित असतात. सिनेमागृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोजे वापरणं बंधनकारक आहे. सिनेमाहॉलमध्ये सुरक्षित अंतर राखूनच तिकीट विक्री आणि बसण्याची आखणी करण्यात आली आहे.’

देशभरातील जवळपास १०-१२ टक्के सिनेमागृहं कायमस्वरुपी बंद झाल्याचा अंदाजचही व्यक्त करण्यात येत आहे. येत्या महिन्यात चित्रपटगृहं खुली न झाल्यास बंद होणाऱ्या थिएटर्सचं प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. देशभरातील पंधरा लाखांहून अधिक लोकांचा रोजगार चित्रपटगृहांवर अवलंबून आहे.वीस लाखांहून अधिक कुटुंब अप्रत्यक्षपणे चित्रपटगृह व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे जर चित्रपटगृह लवकरात लवकर सुरू नाही झाली तर अनेकांवर कायमस्वरुपी बोरोजगाराची परिस्थिती ओढावणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button