breaking-newsराष्ट्रिय

सहा दिवस मृत्यूशी दिली झुंज, जिवंत जाळण्यात आलेल्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू

उत्तराखंडमध्ये जिंवत जाळण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जवळपास सहा दिवस पीडितेने मृत्यूशी झुंज दिली. पण अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. हल्ल्यात पीडित तरुणी 80 टक्के भाजली होती. पोलिसांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ‘तरुणीची प्रकृती खूप गंभीर होती. रविवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. विरोध केला असता त्याने तरुणीला जाळून टाकलं. तरुणी 80 टक्के भाजली होती. तिला दिल्लीमधील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज सिंह असं आरोपीचं नाव असून तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे.

पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आपली मुलगी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल देण्यासाठी गेली होती. आपण तिची घरी वाट पाहत होतो. यावेळी आपल्याला एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मी तुमच्या मुलीला जाळून टाकलं आहे, वाचवू शकत असाल तर वाचवा.

आरोपीने आपल्या मुलीला त्रास देण्याची ही पहिली घटना नसल्याचंही तिच्या आईने सांगितलं आहे. याआधीही अडीच वर्षांपूर्वी आरोपीने आपल्या मुलीला त्रास दिला होता. पण त्यावेळी ते प्रकरण तिथे संपलं होतं. आरोपीचं वय आपल्या मुलीपेक्षा जास्त असून विवाहित आहे. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकलं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मुलीच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे. घराची आर्थिक परिस्थितीदेखील चांगली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कॉलेजमधून स्कुटीवरुन घऱी चालली होती. काही वेळाने एका निर्मनुष्य ठिकाणी आरोपीने तिला थांबवलं आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणीने त्याला विरोध केला. विरोध होत असल्याने संतापलेल्या आरोपीने अंगावर पेट्रोल टाकत तरुणीला जाळून टाकलं. काही वेळाने तेथूनच जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने पीडित तरुणीला पाहिलं आणि पोलिसांना कळवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button