breaking-newsव्यापार

सर्वोच्च न्यायालयाकडून BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बीएस-4 श्रेणीतील BS-IV नव्या वाहनांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहील. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर BS-IV वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर झालेल्या विक्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनच्या काळात BS-IV श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

यापूर्वी न्यायालयाने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने BS-IV वाहनांच्या विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार २४ मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील १० दिवसांत BS-IV श्रेणीतील उर्वरित वाहने विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. तसेच या वाहनांची नोंदणी करण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button