breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधणार – सदाशिव खाडे

– प्राधिकरणातील गृहप्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपुजन
– तीन वर्षांत 14 हजाराहून अधिक घरे बांधणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत 2022 पर्यंत देशात गोरगरीब कुटूंबातील नागरिकांना घरे देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. त्यानूसार
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण 14 हजार 656 सदनिका बांधणार आहे. यापैकी 5 हजाराहून जास्त घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांनी नवनगर प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, अधिक्षक अभियंता अनिल सुर्यवंशी उपस्थित होते.
खाडे म्हणाले की, पेठ क्र. 12 मध्ये एकूण 4883 सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया मंजूर झाली आहे. तसेच 5 हजार सदनिकांच्या प्रस्तावित प्रकल्पांची व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच विविध पेठांमध्ये एलआयजी, इडब्ल्यूएस, एमआयजी, एचआयजी, रोहाऊस बांधण्यात येणार आहेत. या सर्व सदनिका व रोहाऊस यांच्या संख्या 14656 आहे. ही सर्व घरे बाजारभावापेक्षा कमी किंमतीत देण्याचा मनोदय असल्याचेही खाडे यांनी सांगितले.
एमआयडीसीला लागून प्राधिकरणासाठी हवेली तालुक्यातील आकुर्डी, निगडी, भोसरी, रावेत, मोशी (बो-हाडेवाडी), चिंचवड, रहाटणी, चिखली व मुळशी तालुक्यातील वाकड, थेरगाव अशा एकूण 10 गावातील 1794.80 हेक्टर आणि गायरान क्षेत्र 18.95 हेक्टर असे एकूण 1919.84 हक्टर क्षेत्र प्राधिकरणासाठी संपादित आहे. यापैकी 1856.90 हेक्टर क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा मिळाला असून 62.93 हेक्टर क्षेत्र विविध न्यायालयीन दाव्यांमुळे अद्याप ताब्यात नाही. यापैकी विविध योजनांसाठी एकूण 884.73 हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले असून 223.57 हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. याशिवाय 246.17 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. 1994 नंतर ज्या शेतक-यांच्या जमिनी प्राधिकरणाने संपादित केल्या त्या शेतक-यांना शासन निर्णयाप्रमाणे एकरी पाच गुंठे किंवा संपादित जमिनीच्या मोबदल्यात 12.5 टक्के परतावा जमिन वाटप करण्यात येते. प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचे खाडे यांनी सांगितले.
पेठ क्र. 30-32 मध्ये (इडब्ल्यूएस) 792 सदनिका, पेठ क्र. 6 (एमआयजी) 124 सदनिका, पेठ क्र. 6 (इडब्ल्यूएस) 260 सदनिका, पेठ क्र. 6 रोहाऊस 17, पेठ क्र. 1 (इडब्ल्यूएस) 105 सदनिका, पेठ क्र. 1 (एलआयजी, एचआयजी) 222 सदनिका, पेठ क्र. 1 (इडब्ल्यूएस) 400 सदनिका, पेठ क्र. 4 (इडब्ल्यूएस) 105 सदनिका, पेठ क्र. 7 (इडब्ल्यूएस) 400 सदनिका, पेठ क्र. 29 (एलआयजी, इडब्ल्यूएस) 312 सदनिका, पेठ क्र. 29 शिंदे वस्तीजवळ (एलआयजी) 270 सदनिका, पेठ क्र. 32अ, शिंदेवस्तीजवळ (एलआयजी) 600 सदनिका, पेठ क्र. 32अ राखीव जागा (एलआयजी, एमआयजी) 800 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे, अशीही माहिती खाडे यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button