breaking-newsराष्ट्रिय

सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात शिवाजी महाराजांसारखे शौर्य: मोदी

भारतीयांसाठी आजचा दिवस महत्वाचा असून देशातील एका विराट व्यक्तिमत्वाचे आज सर्वत्र नाव झाले आहे. सरदार साहेबांच्या विशाल प्रतिमेचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी व्यक्त केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कौटिल्याची कुटनिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य दिसून येते, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. गुजरातच्या जनेतेने दिलेले सन्मानपत्र माझ्यासाठी महत्वाचे असून या मातीत मी लहानाचा मोठा झालो, इथे माझ्यावर संस्कार घडले. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या पाठीवर थाप टाकते. हे सन्मानपत्र माझ्यासाठी त्यासारखेच आहे, असे मी मानतो.  या सन्मानपत्रामुळे मला अधिक प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे गुजरातच्या जनेतेचे मी आभार मानतो, असे ते म्हणाले.

सरदार पटेलांच्या पुतळ्याबाबतीत सरकारच्या पुढाकारावर राजकीय नजरेतून पाहिले जाते ही आश्चर्याची बाब आहे. देशाच्या विराट व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणं हा गुन्हा आहे का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

ANI

@ANI

Events like today are very very important in a country’s history and such events are difficult to erase. It is a historic and inspiring occasion for all Indians. I am fortunate to dedicate this statue of Sardar Sahab to the nation: PM Modi at the inauguration of

आपले भाषण सुरु करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना आपल्यामागे घोषणा देण्यास सांगितले. त्यांनी सरदार पटेल, अमर रहे.. अमर रहे आणि देश की एकता, जिंदाबाद.. जिंदाबाद अशी घोषणा दिली.

ANI

@ANI

: Prime Minister Narendra Modi says, “if it was not for Sardar Sahab’s resolve, then we Indians would have to take visa to see the Gir lions, pray at Somnath, or to see Hyderabad’s Charminar”.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, सरदार वल्लभभाई यांचा पुतळा उभारण्याचा विचार जेव्हा मी मांडला. तेव्हा शंका-कुशंकेचे वातावरण तयार करण्यात आले होते. हा विचार मनात आल्यानंतर मी इथे एक मोठा डोंगर शोधत होतो. तो खोदून सरदार वल्लभाभाई पटेल यांचे शिल्प साकारता येईल. मात्र, ते शक्य होणार नव्हते. कारण इतका मोठा डोंगर येथे नव्हता आणि तो तितका मजबूतही झाला नसता. मात्र, त्यानंतर आज ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. ज्या पटेल यांनी देशाच्या विभाजनाचे मनसुबे उद्धवस्त केले होते. त्यांच्या या स्मारकामुळे त्यांचे सहज, सामर्थ्य आणि संकल्प आपल्यासमोर राहणार आहे. त्यामुळे अशा लोहपुरुषाला मी शतश: नमन करतो.

जगातील आर्थिक शक्ती म्हणून देश पुढे चालला आहे. यामागे साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सरदार पटेलांचे योगदान होते. कितीही दबाव असला तरी प्रशासनात ठाम राहून काम कसे केले जाते. हे आपल्याला सरदार पटेलांनी दाखवून दिले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आज आपण जाऊ शकतो हे त्यांच्यामुळेच शक्य आहे. क्षणभर विचार करुन पहा जर पटेलांनी देशाच्या एकतेचा संकल्प केला नसता, तर आज गीरचे सिंह, सोमनाथ मंदिरचे दर्शन घेण्यासाठी आणि हैदराबादमधील चारमिनार पाहण्यासाठी व्हिसा काढावा लागला असता. प्रशासकीय सेवेचा पायाही देशाला घालता आला नसता.

ANI

@ANI

I am amazed when some people of our own country dare to see this initiative from a political view & criticise us like we have committed a huge crime. Is remembering country’s great personalities a crime?: PM Modi.

देशाच्या लोकशाहीशी सामान्य लोकांना जोडण्यासाठी सरदार कायमच प्रयत्न करत राहिले. भारतीय महिलांना राजकारणात सक्रिय योगदान देण्यामागे पटेलांचे योगदान होते. महिलांना ज्यावेळी निवडणुकांमध्ये स्थान नव्हते त्यासाठी सरदारांनी त्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न केले. ते नव्या भारताची अभिव्यत्ती आहेत. ही प्रतिमा भारताबाबत सवाल उठवणाऱ्यांसाठी आहे की, भारत शाश्वत होता, शाश्वत आहे आणि शाश्वत राहील. देशातील सर्वसामान्यांनी दिलेली माती आणि लोखंडाच्या माध्यमातून ही प्रतिमा साकारली आहे. हे स्मारक त्या आदिवासींच्या योगदानाचे प्रतिक आहे. भविष्यातला भारत हा तरुणांच्या आकांक्षांचा भारत असल्याचे हे स्मारक प्रतिक आहे. यातून एक भारत, श्रेष्ठ भारत हाच महत्वाचा संदेश जातो.

पटेलांचे स्मारक हे देशाच्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन घडवते. हजारो आदिवासी बांधवांना कायमचा रोजगार मिळणार आहे. सातपुड्यांच्या भागात निसर्गाने तुम्हाला जे दिले आहे. ते तुम्हाला आधुनिक रुपात कायम देणार आहे. सरदारांचे दर्शनासाठी येणारे सातपुडा आणि विंध्य पर्वतांची पाहणीही करतील. यासाठी गुजरात सरकार हा भाग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार आहे. इथले व्हॅली ऑफ फ्लॉवर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होणार आहे. यामुळे येथे पर्यटनाचा विकास झाल्यानंतर येथील पारंपारिक ज्ञानाचाही विकास होईल, त्यामुळे या परिसराचाही विकास होईल. या स्मारकामुळे कृषी क्षेत्रासाठी मोठी चालना मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button