breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही; फक्त…

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने पाहता लोकप्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपात न करता ते वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाहीये…

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सरकारी अधिकारी तेसच कर्मचाऱ्यांना दिली आहे.

राज्याच्या वित्त विभागाने मंगळवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यासाठी  देय वेतनाच्या ५० टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. 

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच टप्प्यात दिले जाते. परंतु, केद्राकडून राज्याला देय असलेली १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम मिळाली असती तर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एकाचवेळी देणे शक्य झाले असते, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button