breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकारला पोलिस यंत्रणेबाबत गांभीर्य नाही – प्रविण दरेकर

– पोलिसांवरील हल्ल्यात वाढ़ झाल्याचा आरोप

– मारहाण झालेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची दरेकर यांच्याकडून विचारपूस

पिंपरी | प्रतिनिधी
सध्या पोलिसांवरील हल्ल्यामधे वाढ होत आहे. सरकारचे पोलिस यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्यानेच या घटना वाढत आहेत. सरकारला पोलिसांबाबत गांभीर्य नाही. येथुन पुढे पोलिसांवरील हल्ले करणारी प्रवृत्ति सहन करणार नाहीं. राज्य सरकारने देखील ही प्रवृत्ती संपविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

कासारवाड़ी येथील मैक्स न्युरो हॉस्पिटलमधे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी दरेकर आले होते. या वेळी ते बोलत होते.

या वेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, राजु दुर्गे, मोरेश्वर शेडगे आदिसह भाजप पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले की, वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांना रॉडने मारहान करण्यात आली. सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचा जीवच सध्या धोक्यात आहे. या घटना वारंवार घडतात. तय ठिकाणी मी जातो. पोलीसच असुरक्षित असतील तर त्याबाबत न्याय कोणाकडे मागणार असा प्रश्न आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. पूर्वी हाफ पैंट घालुन पोलिस आले की नागरिक घाबरायचे. मात्र आता ती परिस्थिति राहिली नाही. संबधित वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला जबर इजा झाली आहे. त्याबाबत लागेल ती मदत आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून करु, असे आश्वासन या वेळी दरेकर यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button