breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सभागृह नेतेपदी नामदेव ढाके निश्चित, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची शिफारस

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता येताच पक्षाचे प्रथम महापौर होण्याची संधी हातून निसटल्याने मागे राहिलेले पक्षाचे निष्ठावंत नगरसेवक नामदेव ढाके यांना आता सत्तारुढ पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्या नावाची शिफारस पक्षाकडून पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांची मान्यता मिळताच ढाके यांची पक्षनेते म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाच्या जुन्या जाणत्या गटाने महापौर पदावर दावा ठोकला होता. त्यावेळी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नामदेव ढाके यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या गटाचे नितीन काळजे यांचे नाव समोर आल्याने ढाके यांच्यावर अन्याय झाला होता. ती कसर भरून काढण्यासाठी ढाके यांना सभागृहनेते पदावर पक्षाकडून संधी देण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या जुन्या गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते एकनाथ पवार यांनी पक्षनेते पदाचा अचानकपणे राजीनामा दिल्याने सर्वांना धक्का बसला. भाऊ आणि दादांच्या हस्तक्षेपाला वैतागून पवार यांचा राजीनामा समोर आल्याची चर्चा सर्वत्र रंगली. असे असले तरी, तीन वर्षे पवार यांनी अत्यंत कोणालाही न दुखावता प्रामाणिकपणे कामकाज केले. तथापि, या रिक्त पदावर आता नामदेव ढाके यांच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र विभागीय आयुक्तांना आज बुधवारी (दि. 12) देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर महापौर उषा ढोरे यांच्यामार्फत ढाके यांची सभागृहनेते म्हणून अधिकृतरित्या निवड होईल, अशी माहिती पक्षाकडून कळविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button