breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सभागृहातील लढवय्या वाघ निघून गेला’, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी वाहिली श्रध्दांजली

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सभागृहातील वाघ आज आपल्याला सोडून निघून गेला, असा वाघ पुन्हा होणे नाही. अशा शब्दात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिवंगत नगरसदस्य व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांना श्रद्धांजली वाहिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नगरसदस्य, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय (दत्ता) बाबुराव साने यांचे आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विट्ठल उर्फ नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, मनोज माछरे उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या काकांचा स्वभाव हसरा, मनमिळावू आणि जे काम आपल्याला करायचे आहे ते शब्दामध्ये मांडून आपला विषय सभागृहात कसा मंजूर होईल याकडे त्यांचे लक्ष असायचे असे त्या म्हणाल्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, एक चांगला, स्पष्ट वक्ता असा आमचा मित्र आज महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी सोडून गेलेला आहे. सर्व सभासदांना सातत्याने प्रेरणा देणारे आमचे एक व्यक्तीमत्व हरवले आहे. असे सांगून महानगरपालिकेचा सर्व परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते विट्ठल उर्फ नाना काटे म्हणाले, काका गोरगरिबांना मदत करण्यासाठी सतत काम करायचे आणि त्यांचे मदतीचे कार्य सुरु असतानाच कोरोनाच्या आजाराने काकांना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button