breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी भाजपला विरोधकांची भिती ; सर्वसाधारण सभा तहकूबीने विकासाला खीळ

पिंपरी – ‘साफ नियत-सही विकास’ म्हणणा-या सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी विरोधकांना घाबरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूबीचा सपाटा लावला आहे. मे महिन्याची सभा तब्बल तीन वेळा तहकूब करुन हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, शहरातील विविध विकास कामांचे प्रस्ताव रेंगाळल्याचे थोडेही सोयरसुतक भाजप पदाधिका-यांना राहिलेले नाही. केवळ पार्किंग धोरण, पोलिस आयुक्तालयाचा शाळा स्थलांतर प्रस्ताव यावर विरोधक गोंधळ घालून धारेवर धरतील, यामुळे वारंवार सभा तहकूब करण्याचे धोरण राबविले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक विकास कामांचे प्रस्ताव मंजूरी अभावी प्रलंबित आहेत. त्यावर सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे काहीही देणं-घेणं नाही. गेल्या सव्वा वर्षात तब्बल 20 वेळा महासभा तहकूब करण्याची लाजीरवाणा प्रकार केला असून त्यांनी 188 ठराव आतापर्यंत केले आहेत. मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग तीन वेळा कोणतेही सबळ कारण न देता तहकूब केली आहे. तर 20 जूनची सभा 22 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी किरकोळ कारणे पुढे करत वारंवार महासभा तहकूब  करत आहेत. यामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काळात हेच विरोधक सभा तहकुबीवरून टीका करायचे. आता सत्तेत आल्यानंतर भाजपचे पदाधिकारी सभा तहकुबीचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. दोन महिने सर्वसाधारण सभा होत नसेल, तर शहराचा विकास खुंटणार आहे, याचे सत्ताधाऱ्यांनी भान ठेवावे.

आता मे आणि जून महिन्याची अशा दोन्ही सभा होणार शुक्रवारी (दि.22) रोजी होणार आहेत. आज (बुधवार) महासभा भय्यु महाराज , काश्‍मिरमधील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून 22 जूनला दुपारी दोन वाजेपर्यंत तर जून महिन्याची मासिक सभा 22 जुनला दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही तहकूब सभा शुक्रवारी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button