breaking-newsक्रिडा

सचिन-कांबळी मुंबईच्या मैदानात पुन्हा एकत्र

शालेय क्रिकेट खेळताना मुंबईच्या वेगवेगळया मैदानांवर धावांचा पाऊस पाडणारी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. विनोद कांबळीने बालमित्र सचिनला त्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच सचिन आणि विनोदची जोडी प्रसिद्ध आहे.

१९८८ साली शालेय क्रिकेट स्पर्धेत आझाद मैदानात ६६४ धावांची भागीदारी रचल्यापासून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघे चर्चेत आले. आता सचिन तेंडुलरकर आणि विनोद कांबळी मुंबईतील वेगवेगळया मैदानांवर जाऊन युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार आहेत. ज्यांचा फायदा मुंबई आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटला होईल.

सचिन इंग्लिश मिडलसेक्स काउंटी क्लबसोबत मिळून नवी क्रिकेट प्रबोधिनी स्थापन करणार आहे. तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी नावाने ही प्रबोधिनी ओळखली जाईल. या अॅकेडमीसाठी सचिनने निवडलेल्या टीममध्ये विनोद कांबळी सुद्धा आहे. सचिन स्वत: या लहान मुलांना प्रशिक्षण देणार आहे.

शाळेत असल्यापासून मी आणि विनोद एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. नुकतेच आम्ही भेटलो त्यावेळी मी विनोदला या प्रोजेक्टबद्दल सांगितले त्यावेळी त्याने लगेच होकार दिला असे सचिनने भूतानवरुन मुंबई मिररशी बोलताना सांगितले. १९९० च्या दशकात मुंबई क्रिकेटमध्ये सचिन आणि कांबळीच्या जोडीला जय-वीरुची जोडी म्हटले जायचे.

सचिनने माझ्यासमोर प्रस्ताव मांडताच मी त्याला लागलीच होकार दिला. माझ्यासाठी हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासारखे असून ही एक मोठी संधी आहे. सचिनसोबत मैदानावर जाऊन युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणे ही माझ्यासाठी एक चांगली संधी असून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतील. माझ्यावर सचिनने जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे असे विनोद म्हणाला.

सचिनचही अॅकेडमी राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये कॅम्प आयोजित करुन प्रशिक्षण देण्याबरोबरच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेणार आहे. १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्यानंतर ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वांद्रे एमआयजी क्लब येथे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. ७ ते १७ आणि १३ ते १८ वयोगटातील क्रिकेटपटू या कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतात. १२ ते १५ नोव्हेंबर आणि १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे कॅम्प होईल.

अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सचिनने निवृत्तीनंतर दिलेल्या पार्टीला कांबळीला बोलावले नव्हते त्यावेळी सचिन आपल्याला विसरला अशी प्रतिक्रिया कांबळीने दिली होती. पण आता दोघांमधले मतभेद दूर झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button