breaking-newsक्रिडामहाराष्ट्रमुंबई

सचिनला घडवणारे भीष्माचार्य हरपले, रमाकांत आचरेकर यांचं निधन

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लहानपणीचे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याचं समोर येतंय. मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना जेवताना त्रास होत असल्यामुळे, अन्न पातळ करुन भरवलं जात होतं. मात्र आज, संध्याकाळच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.

The Hindu

@the_hindu

Just in: Sachin Tendulkar’s coach Ramakant Achrekar dies in Mumbai. PTI

39 people are talking about this
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button