आंतरराष्टीय

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरवर चर्चेची शक्यता

संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या प्रवक्त्याचे सुतोवाच

संयुक्त राष्ट्रे  : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन पुढील आठवडय़ात सुरू होत असून त्यात काश्मीर प्रश्नी चर्चा होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी आमसभेच्या निमित्ताने या प्रश्नावर चर्चा घडवण्याचे ठरवले आहे, असे संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

गट्रेस यांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजारिक यांनी गुरुवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी काश्मीर प्रश्न  संवादाच्या मार्गाने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून ते टाळण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते संवादाच्या मार्गाने या प्रश्नावर  तोडगा काढावा असे सांगत आहेत. गट्रेस यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी संपर्क साधला असून त्यांनी आमसभेतही या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याचे सूचित केले आहे.

बुधवारी गट्रेस यांनी असे म्हटले होते, की काश्मीर प्रश्नावर भारत व पाकिस्तान यांनी संवादातून तोडगा काढणे गरजेचे आहे. याशिवाय मानवी हक्कांचे पालनही झाले पाहिजे. आम्ही दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास तयार आहोत, पण त्यांनी ती स्वीकारली तरच त्यात पुढे काहीतरी करता येईल.

एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पालन झाले पाहिजे व दोन्ही देशांनी या चर्चा करून या द्विपक्षीय प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button