breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

संभाजीराजे पाठिंबा द्या, बारा हत्तींचं बळ मिळेल – गोपीचंद पडळकर

कोल्हापूर | धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विनंती केली आहे. यासाठी पडळकर यांनी पत्र पाठवून पाठिंब्याची विनंती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रामध्ये मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणालाही पाठिंबा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. इतंकच नाही तर पाठिंबा दिल्यास समाजाच्या लढ्याला 12 हत्तींचं बळ येईल असेही पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.

आरक्षणाच्या अभ्यासाचा आणि रोखठोक भूमिकेचा धनगर आरक्षणासाठी उपयोग व्हावा अपेक्षा यावेळी पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button