breaking-newsTOP News

संपूर्ण देशभर लस देण्यासंदर्भात कधीही सांगितले नाहीः आरोग्य सचिव

मुंबईः सरकारने कधीही संपूर्ण देशभर लस पुरविण्याचे सांगितले नाही, असे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेले आहे. जगभर कोरोना लस शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सर्वसामान्यांना ही लस मिळणार का? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

आरोग्य विभागाच्या सचिवांचे हे विधान चिंताजनकच आहे. लसीकरण हे त्या लसीच्या परिणामकारकतेवर अवलंबून असतं. तसेच आमचा प्रयत्न हा कोरोना संक्रमण साखळी तोडण्याचा आहे. जर आपण अत्यंत गंभीररीत्या संक्रमीत जनसमुदायाला लस दिली तर ही साखळी तोडू शकू. आणि त्यामुळे आपल्याला संपूर्ण देशभर लसीकरण करण्याची गरजच भासणार नाही, असे आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भारगव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button