breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संतापजनक! गोंदियात विद्यार्थीनीवर अ‍ॅसिडहल्ला

गोंदिया | महाईन्यूज

जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने बुधवारी सकाळी अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली. दुचाकी वाहनावरून दोन तरुण या पिडित मुलीच्या जवळ आले. त्यांनी तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तात्काळ फरार झाले आहेत. काय घडले हे कळायच्या आतच त्यांनी तेथून धूम ठोकली आहे.

ही तरुणी नागपुरात शिक्षण घेत असून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली असताना ही घटना घडली. या तरुणीचे शरीर अ‍ॅसिडने भाजले असून तिला नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button