breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘संतपीठा’च्या 50 लाखांची तरतुद माध्यमिक शिक्षण विभागाकडे होणार वर्ग

– शिक्षण समितीचा स्थायीपुढे ऐनवेळी ठेवला प्रस्ताव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिखली टाळगाव येथील जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे संतपीठ उभारण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिका अंदाजपत्रकात संतपीठाच्या लेखार्शिषावर 50 लाखाची तरतुद ठेवण्यात आली होती. मात्र, ती रक्कम यंदा खर्च होणार नसल्याने माध्यमिक शिक्षण विभागाच्या विविध उपक्रम या लेखार्शिषावर 50 लाख रुपये वर्ग करण्यात यावे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ऐनवेळी दाखल झाला आहे. त्यामुळे संतपीठाची तरतूद रक्कम वर्ग होणार का? यावरुन सत्ताधारी-विरोधात जुंपण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यासाठी आरोग्य सेवा व विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका माध्यमिक विभागाकडून मूळ अंदाजपत्रक सन 2018-19 यामधील लेखाशिर्ष चिखली टाळगाव येथील जगदगुरु तुकाराम महाराज संतपीठ यावर रक्कम रुपये 50 लाख रुपये इतकी तरतूद करणेत आली होती. तरी या लेखाशिर्षावरुन या विभागाकडून अद्यापी कोणतेही काम करण्याचे प्रस्तावित नाही. त्यामुळे चिखली टाळगाव येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ या लेखाशिर्षावरुन कोणताही खर्च होणार नसल्याने सदरची रक्कम 50 लाख रुपये माध्यमिक शिक्षण विभागातील विविध उपक्रम या लेखाशिर्षावर वर्ग करणेत यावी, याकरिता स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव ऐनवेळी दाखल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button