breaking-newsपिंपरी / चिंचवड

संजोग वाघेरे पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्या, संदीप काटे यांनी दादांसोबत साधला संवाद

– प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देखील केली मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून विधान परिषदेवर संधी मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांना पक्षाकडून संधी देण्यात यावी, अशी शिफारस पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. काटे यांनी पक्षाकडे देखील याबाबत रितसर मागणी केली आहे.

शुक्रवारी विधान भवन, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोजक्या साथीदारांसह वाघेरे-पाटील यांनी भेट घेतली. या छोटेखानी बैठकीत समर्थकांची शिफारस केलेले निवेदनही देण्यात आले. दरम्यान, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह काही आजी-माजी नगरसेवकांनी वाघरे-पाटलांच्या आमदारकीसाठी समर्थन दिले आहे.

त्यातच पिंपळे सौदागर येथील पक्षाचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी देखील वाघेरे पाटील यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काटे यांनी यासंदर्भात मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देखील काटे यांनी यासंदर्भात मागणी केली आहे. शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी शहरात प्रभावी नेतृत्व तयार होणे गरजेचे आहे. वाघेरे पाटील यांना संधी दिली तर आगामी महापालिका निवडणुकीत ते फायदेशीर होणार आहे, असे काटे यांनी म्हटले आहे.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या जोडीला अन्य एक नेतृत्व तयार होईल. दोघांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम सुरु केले तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता मिळविण्यात यश येईल.

संदीप काटे, युवा कार्यकर्ते, पिंपळे सौदागर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button