breaking-newsमनोरंजन

“संजू’मधील रोलसाठी आमिर खानने दिला होता नकार

संजय दत्तचा बायोपिक “संजू’ 29 जूनला रिलीज होणार आहे. यामध्ये रणबीर कपूरच्या मुख्य रोलबरोबर परेश रावल हे संजयचे वडील सुनिल दत्तच्या रोलमध्ये दिसणार आहेत. हा रोल पूर्वी आमिर खानला द्यायचे ठरले होते. डायरेक्‍टर राजू हिरानी आणि आमिर खान दोघेही चांगले मित्र आहेत.

आमिरच्या सिनेमांसाठी बऱ्याचवेळी राजू हिरानी कथा लिहीत असतो. जेंव्हा राजू हिरानीने “संजू’ची कथा आमिरला ऐकवली तेंव्हा आमिरने या सिनेमात आपल्यालाही एक रोल करायला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली होती. ते लक्षात ठेवून राजूने स्निल दत्त यांचा हा रोल आमिरला देण्याचा आग्रह धरला होता. मात्र आमिर खानने हा रोल करायला साफ नकार दिला होता. त्याच सुमारास आमिर “दंगल’मध्ये एका वयस्कर व्यक्‍तीचा रोल करत होता.

पुन्हा तसाच वयस्कर व्यक्‍तीचा रोल करण्याची कल्पना आमिरला रुचली नाही. “संजू’मध्ये नर्गिस दत्तच्या रोलमध्ये मनिषा कोईराला, मान्यता दत्तच्या रोलमध्ये दिया मिर्झा, टीना मुनीमच्या रोलमध्ये सोनम कपूर आणि माधुरी दीक्षितच्या रोलमध्ये करिष्मा तमन्ना करणार आहेत. कुमार गौरवच्या रोलमध्ये विकी कौशल आणि सलमानच्या रोलमध्ये जिम शर्भ दिसणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button