breaking-newsराष्ट्रिय

संगीतकार ए. आर. रहमान आता सिक्कीमचे ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर

गंगटोक – प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांची सिक्कीम राज्याच्या ब्रॅंड ऍम्बॅसिडरपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. या विषयीची अधिूसचना राज्य सरकारने आज जारी केली.

सिक्कीम हे राज्य गेली दोन दशके जागतिक इको टुरिझम सेंटर म्हणून जगभरात प्रख्यात झाले आहे. हे राज्य शंभर टक्के सेंद्रीय शेतीसाठी प्रसिद्ध आहे. रहमान हे या राज्याच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून या आधी कार्यरत होते आता त्यांना संपुर्ण राज्याचेच ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button