breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शेतक-यांचं ‘तुफान आलंया’… पिंपरी-चिंचवडकरांचे पाणी ‘तोडले’

मावळातील शेतक-यांचा एल्गार!
पिंपरी : राज्यातील शेतक-यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला मावळातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, संतत्प शेतक-यांनी पिंपरी-चिंचवडला पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवस बंद केला. त्यामुळे शहरात एक दिवस पाणीबाणी निर्माण होणार आहे.
राज्यभर शेतक-यांनी रान पेटवले आहे. केंद्र, राज्यातील सत्ताधारी भाजपसोडून सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. मावळमधील शेतक-यांनीही आक्रमक भूमिका घेतली. भाजपसोडून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतक-यांनी सोमवारी सकाळी पवना धरणावर धडक दिली. मुख्य शहरांची ‘रसद तोडणे’ ही आंदोलकांची भूमिका आहे. त्यामुळे पुणे-मुंबईसह राज्यातील प्रमुख महामार्गांवर शेतक-यांनी नाकाबंदी केली आहे. शेती उत्पादने, दूधाचे टँकर अडवले जात आहेत. दरम्यान, अंदोलनाचा भाग म्हणून मावळातील शेतक-यांनी थेट पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीपुरवठाच बंद करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी शेतक-यांनी पवना धरणावर जावून आंदोलन केले. यावेळी पाठबंधारे विभागाच्या अधिका-यांनी पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले. इतकेच नव्‍हे तर पाणीपुरवठा बंद करेपर्यंत शेतकरी ठाण मांडून बसले होते. त्यामुळे अधिका-यांनाही पाणीपुरवठा बंद करावा लागला, अशी माहिती पाठबंधारे विभागाचे अधिकारी मनोहर खाडे यांनी दिली.
——————-

‘उद्योगनगरी’ चा पाणीपुरवठा विस्कळीत…
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला होणारा नियमित पाणीपुरवठा एक दिवस शेतक-यांनी बंद केला. त्यामुळे शहरतील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील काही भागांत अगोदरच उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच महापालिका प्रशासनानेही पाणीकपातीचे धोरण घेतले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणखीच पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button