breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

अहमदनगर – कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावात अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आजअखेर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेतले. आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारनं दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असं आश्वासन कृषिराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यात हे आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती बिघडल्यानं शुक्रवारी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं होतं. पोलिसांनी बळजबरी केल्यामुळं गावात तणाव निर्माण झाला होता. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलक मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असं खोतकर यांनी सांगितलं. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाहीच्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार पीकाला हमीभाव द्या,  दुधाला लिटरमागे ५० रुपये दर द्या, ट्रॅक्टर व अन्य कृषिउपोयगी अवजारांवर १०० टक्के अनुदान द्या,   शेतीशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी रद्द करार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button