breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शेतकरी संतापले; लसणाचे भाव नीचांकी पातळीवर

भोपाळ : लसणाचे भाव २ रु./किलो पर्यंत घसरल्याने मध्य प्रदेशातील शेतकरी आणखी एका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मध्य प्रदेशातील घाऊक बाजरात लसणाचे भाव २ रु./किलोपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादन किंमत भरून काढतानादेखील मोठा संघर्ष करावा लागत आहे.

लसूण उत्पादक शेतकऱ्यांना ‘भावांतर योजनेतून’ अतिरिक्त ८ रु./किलो याप्रमाणे भाव देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र ते स्वीकारण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे. खरे तर, ३० रु./किलो वरून सध्याच्या २ रु./किलो भाव होण्यास ही योजना जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. लसणाचे गडगडलेले भाव पाहून भोपाळ सीमेवरील कर्नोड येथील घाऊक भाजीपाला बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे आंदोलन छेडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button