breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शेतकरी आंदोलनाला ‘पाकिस्तान’ कडून रसद; भाजपच्या ‘या’ नेत्यांचे वादग्रस्त विधान

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापाैर केशव घोळवे यांचे वादग्रस्त विधान

पिंपरी |महाईन्यूज|

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतक-यांनी आज (मंगळवार) भारत बंद पुकारण्यात आला आहे. या शेतक-यांच्या आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून रसद पुरविली जात असल्याचे वादग्रस्त विधान पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर माई ढोरे होत्या. सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेने घोषणा देत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कृषी कायद्याविरोधात सभा तहकूबीची मागणी विरोधकांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजपच्या महापाैरांनी सभा तहकूब करण्यास नकार दिला.

यावेळी विरोधकांच्या भाजपवरील टिकेला उत्तर देताना उपमहापाैर केशव घोळवे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी कायदे शेतक-यांच्या फायद्याचे असल्याचे समाजावून देताना दिल्लीत सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनास चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात असल्याचे म्हटले.

त्याबरोबर दिल्लीत शेतक-यांनी सुरू केलेले हे आंदोलन मँनेज केलेले असल्याचेही ते म्हणाले. आंदोलक भाडेकरु आहेत. त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान, उपमहापौरांनी केलेल्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान व चीनकडून रसद मिळते. भाड्याचे लोक आणले. या प्रकारचे उदगार शेतकरी आंदोलनाबाबत भरसभेमध्ये काढून शेतक-यांची भाजपच्या उपमहापौरांनी थट्टा उडविली. ही बाब अतिशय निंदनीय असुन देशातील तमाम शेतक-यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळॆ त्यांचा जाहीर निषेध करत असून त्यांनी शेतकरी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button