breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाईन्यूज | मुंबई

काँग्रेस नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्यानंतर त्यांनी आपला कार्यभार स्विकारला. यावेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांचे अभिनंदन केले तसेच शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आपल्याला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सभागृहाचा नेता म्हणून सभागृहाच्यावतीने आपले स्वागत करतो. विधानसभा हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. याचे कामकाज तुम्ही चांगल्यापद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला स्वभाव बंडखोर स्वरुपाचा आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपले मत मांडताना कोणाचीही भीती न बाळगणारा महाराष्ट्राचा हा सुपुत्र अध्यक्षदी विराजमान झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button