breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर तीन गुन्हे दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. हे प्रलंबित खटले असल्याचे उमेदवार बारणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून काल मंगळवारी (दि. 9) आपला नामनिर्देशन अर्ज भरला. त्यासोबत त्यांनी स्वतःचे शपथपत्र देखील जोडले आहे. त्यात उमेदवार बारणे यांच्यावर नियमभंग केल्याचे तीन गुन्हे दाखल असल्याचे नमूद आहे. देहूरोड पोलीस ठाणे, चाकण पोलीस ठाणे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल आहेत. ते प्रलंबीत घटले असल्याची नोंद बारणे यांनी शपथ पत्रात केली आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी आकरा वाजून 5 मिनीट ते 1 वाजून 40 वाजेच्या दरम्यान जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. बैलगाडा शर्यत बंदी विरोधात बारणे यांनी बैलांसह रस्त्यावर येऊन बेकायदा जमाव जमवून राष्ट्रीय वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच, पुणे-नाशिक महामार्गावर बेकायदेशीर व्यासपीठ बनवून त्याठिकाणी चितावणीखोर भाषणे दिली. समाजात दंगा पसरविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 जुलै 2013 रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन दरम्यान पिंपरी-चिंचवड घर बचाव कृती समितीतर्फे निगडी ते विधान भवन मुंबई अशी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत बारणे यांचा सहभाग होता. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बेकायदेशीर आंदोलन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे. 10 ऑगस्ट 2012 रोजी दुपारी पावने बारा वाजण्याच्या सुमारास बऊर गावच्या हद्दीमध्ये उर्से टोलनाका येथील दृतगती महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहने थांबवून जमावबंदीचा आदेश जुगारल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 15 फेब्रुवारी 2016 रोजी बारणे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. हे प्रलंबित खटले असल्याचे बारणे यांनी शपथपत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button