breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिवसेना- भाजपकडे विकास कामे करायची धमक नाही – पार्थ पवार

  • पंतप्रधान, मुख्यमंत्री तुमचा, तरी पण प्रश्न प्रलंबित कसे काय? पार्थ पवारांचा सवाल
  • खासदार बारणेंना कामे करण्यापेक्षा पुरस्कार मिळवण्यात रस होता

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पंतप्रधान, मुख्यमंत्री तुमचा आहे, देशात-राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. तरी पण तुम्ही मावळातील सगळे प्रश्न सोडविले का नाहीत, हे सगळे प्रश्न ते लगेच सोडवू शकले असते. मात्र, मी आत्ताच्या लोकप्रतिनिधींकडे बघतोय, त्याच्या कामाची पध्दत बघतोय, एक लक्षात आलं की, त्याच्याकडे धमक नाही, त्याना लोकांच्या प्रश्नासाठी भांडायला येत नाही, कारण वरिष्ठ एखादा नेता आला की हे सगळे गप्प बसतात. म्हणूनच मावळात मला लक्ष द्यावं लागलं आहे. यापुढे मावळातील एक पण प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. विमानतळ, रेल्वे, पाणी, रेडझोन, रस्ते, सिडको या सारखे सगळे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले.

पनवेलमधील गव्हान येथे आयोजित केलेल्या महाआघाडीच्या सभेत पार्थ पवार बोलत होते. यावेळी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्थ पवार पुढे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघात कित्येक प्रश्न प्रलंबित आहेत. रेडझोन, विमानतळ, रेल्वे, रस्ते, सिडको, आदिवाशी भागात पाणी पुरवठा, पर्यटन, यासह अनेक प्रश्न कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत. त्या प्रश्नाकडे कायम आत्ताच्या खासदारांनी डोळेझाक केली. त्याच्यासाठी एक खासदार बननंच एक मोठी गोष्टी होती. केवळ विमानात बसून दिल्लीत जावून आराम करणं एवढंच त्याचं काम होतं. त्याच्यापुढे प्रश्न मांडून ते सोडवणं हे महत्वाचं नव्हतं. तर कामापेक्षा पुरस्कार मिळवणं, त्याच्यासाठी महत्वाचं होतं. त्यामुळे पुरस्कार मिळवण्यासाठी एवढे प्रश्न रजिस्टर करायचं, आणि ते रजिस्टर झालं की पुरस्कार मिळतो, हेच पाच वर्षांत काम केले आहे. त्यांनी रजिस्टर केलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्न सोडविले, माझं लक्षात आलं की, त्यातील एक प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे आत्ताच्या सरकारनेही काय केलं नाही, आणि खासदारांनीही काही केलं नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

60 वर्षांपासून पवार अनं शेकापचं ऋणाणूबंध

पवार कुटूंबिय आणि शेतकरी कामगार पक्षाचं नातं गेल्या 60 वर्षांपासून आहे. आमच्या पवार कुटूंबियात माझी पणजी (म्हणजे माझ्या आजोबा शरद पवार यांची आई) शेकापमध्ये होत्या. त्यानंतर आमचे एन.डी.पाटील (मामा) शेकापमध्ये आहेत. त्यामुळे आमचं शेकापशी कित्येक पिढ्यांपासून नातं असून हे लोक आम्हाला कायम आवडतात. असेही पार्थ पवार यांनी यावेळी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button