breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवशाही व्यापारी सेनेच्या निवेदनानंतर पालिकेला जाग

  • पाणी पुरवठा पाईपलाईन दुरूस्तीचे काम घेतले हाती

पिंपरी – काळेवाडीतील तापकिरनगर परिसरातील नागरीकांना मैला मिश्रीत पाणीपुरवठा करणा-या पाणीपुरवठा प्रशासनावर कारवाई करण्याबाबत शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देताच पालिकेने तातडीने कार्यवाही हाती घेतली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग प्रभागांतर्गत तापकीरनगर येथील नागरिकांना दुषीत पाणीपुरवठा केला जात होता. ही बाब माहीत असून देखील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संबंधित कर्मचा-यांना सूचना देत नव्हते. त्यावर तातडीने शिवशाही व्यापारी सेनेचे अध्यक्ष दाखले यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आयुक्तांनी तातडीने पाणी पुरवठा विभागाला आदेश दिले. सोमवारी (दि. 16) पालिका अधिका-यांनी पाईपलाईन दुरूस्तीचे काम हाती घेतले. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा करण्याबाबत दाखले यांनी आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button