breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

शिवशाहीर पुरंदरे यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवप्रेमींकडून ‘ट्रोल’

‘नेटिझन्स’नी घेतला समाचार : ‘त्या’ पोस्टवर ‘निषेध’च्या कमेंट्सचा वर्षाव

पुणे । विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली. त्यावर ‘आशिर्वाद’ घेतल्याची ‘पोस्ट’ करीत कोल्हे यांनी नवा वाद ओढावून घेतला. सोशल मीडियावर नेटिझन्सनी कोल्हे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत ‘निषेध’ च्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी शिवशाहीर पुरंदरे यांची भेट घेतली. यावर आपल्या फेसबूक पेजवर कोल्हे यांनी ‘‘आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका, आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी ‘शिवगंध’ पुस्तक  त्यांना दिले आणि त्यांच्याकडून ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ ही दिवाळी पुस्तक भेट मिळाली. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण!’’

अशी पोस्ट फोटासहीत व्हायरल केली.

दरम्यान, ‘जेम्स लेन’ आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील प्रकरणानंतर शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर नाराज असलेल्या शिवप्रेमींना डॉ. कोल्हे यांची भेट रुचलेली नाही. एव्हढेच नव्हे तर महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा पुरंदरे यांच्या लिखाणाचा निषेध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह संभाजी बिग्रेडच्या विचारांनी प्रभावीत झालेल्या शिवप्रेमींना पुरंदरे यांचे कौतूक रुचत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

असे असले तरी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. तसेच, मार्गदर्शनही घेतले. विशेष म्हणजे आगामी चित्रपट, मालिका याबाबत मार्गर्शन घेत ‘व्यावसायिक’ संवाद केल्यामुळे शिवप्रेमी डॉ. कोल्हेंच्या ‘पेज’वर संताप व्यक्त करीत आहेत. 

https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/posts/4121754054507753
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button